रणबीरसाठी कैटरीना जीव की प्राण

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि चिकली चमेली कैटरिना कैफ यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकत्र सुट्टी एन्जॉय केली. त्या्च फोटोही नेटवर झळकले होते. त्यारमुळे अनेक दिवसांपासून दोघांच्या प्रेमलीलेच्याट चर्चा रंगल्या असताना रणबीरने त्यादच्याळसाठी कैटरीना ही जीव की प्राण असल्या्चे म्ह टले आहे. त्या्मुळे दोघेपण रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वीच कैटरीनाला रणबीरच्या घरातून बाहेर पडताना अनेकांना पाहिले होते. मात्र या दोघांनी आपल्या रिलशेनबद्दल आत्तापर्यंत अवाक्षरही काढले नाही. पण आता मात्र रणबीरने या विषयावरचे आपले मौन सोडत कैटरीना आपल्यासाठी एक खास व्यक्ती असल्याचे व तिच्यासाठी आपण जीवही देऊ शकतो असे मान्य केले आहे.

याबाबत अधिक बोलताना रणबीर म्हणला, ‘माझ्या आयुष्यात अशा खूप कमी व्यक्ती आहेत, ज्या माझ्यासाठी खूप खास आहेत. त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो, प्रसंगी माझा जीवही देऊ शकतो. त्या खास व्यक्ती कोण असे विचारल्यावर रणबीर म्हणाला, माझी फॅमिली, अयान मुखर्जी, कैटरीना या लोकांसाठी मी काहीही करू शकतो. रणबीरच्या या बोलण्यावरून त्याचे व कतरिनाचे नाते नक्कीच स्पष्ट होते. आता ते दोघे खुलेआम कधी आपल्या प्रेमाची कबुली देत असल्याने त्याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.’

Leave a Comment