पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात नाही – नरेंद्र मोदी

अहमदाबाद – मी पंतप्रधानपदाचे स्वप्न कधीच पाहात नाही, मी ते पाहायलाही नको कारण असे स्वप्न पाहणारा बरबाद होतो असे गुजराथचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एका विद्यार्थीनीने त्यांना पंतप्रधानपदाबाबत विचारले असता ते बोलत होते.

मोदी म्हणाले की मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात नाही मात्र पंतप्रधान बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुजराथी जनतेने माझ्यावर २०१७ पर्यंत त्यांची जबाबदारी सोपविली आहे व ती पूर्ण करण्यावर माझा सध्या भर आहे.

मोदी या महिन्यात २६ सप्टेंबरला अमेरिकेतील भारतीयांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून संवाद साधणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.