आमीर करणार सिनेमाचे दिग्दर्शन

बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट’ अमिर खान नुसता गप्प बसणे शक्यच नाही. वर्ष-दोन वर्षांतून एकच गुणात्मक सिनेमा करणारा आमीर नक्कीच काहीतरी धमाका घेऊन येणार हे निश्चित. त्यातमुळे अमिर आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमीर आगामी काळात सिनेमाचे दिग्दर्शन करणार असल्याचे समजते.

आमिर ‘धूम थ्री’ सिनेमातील नृत्याचे धडे घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेला. मात्र एकीकडे नृत्याचे शिक्षण घेत असतानाच त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा दिग्दर्शनाचे वारे वाहू लागले आहेत, असे सूत्रांकडून समजते. ‘धूम थ्री’ चे शुट आता संपले आहे. सध्या सिनेदिग्दर्शनाचा विचार त्याच्या मनात घोळत असून त्या दृष्टीने पुढच्या योजना आखल्या जात आहेत.

‘धूम थ्री’नंतर राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पी. के.’ सिनेमाच्या उर्वरित शुटला प्रारंभ होईल. ते झाल्यावर आमिर खान ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या कामात व्यग्र होणार आहे. पुढच्या वर्षीसाठी सत्यमेव जयते हा कार्यक्रम वगळता अन्य कुठलाही सिनेमा आमिरने घेतलेला नाही. त्यामुळे हा वेळ तो स्वत:ला सिनेमा दिग्दर्शनासाठी ठेवणार असल्याचे समजते. ‘तारे जमीं पर’ या चित्रपटासाठी आमिरने सहदिग्दर्शन केले होते. आता तो स्वतंत्रपणे पूर्ण चित्रपट दिग्दर्शन करणार आहे. त्याने आपल्या चित्रपटासाठी पटकथा निवडल्याचे समजते.

Leave a Comment