पंतप्रधान मनमोहन सिंह यांची शिष्टाई असफल

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोळसा घोटाळ्याच्या हरवलेल्या फाईल्सवरून संसदेत विरोधी पक्षाकडून गोंधळ सुरू आहे. सुरू असलेला गदारोळ थांबावा आणि नियमित कामकाज सुरू होऊन प्रलंबित विधेयकं संमत व्हावीत, यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केलेल्या प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही. पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री उशीरा यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

यासंदर्भत पंतप्रधान मनमोहन सिंह भाजपच्या तीन ज्येष्ठ नेत्यांसोबत विशेष बैठक घेतली. एकूण कोळसा घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्यामुळे हरवलेल्या फाईल्सचा शोधाबाबतही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे सरकारला त्याबाबत फारसे काही आश्वासन देता येणार नसल्याची माहिती त्यांनी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना दिली. पंतप्रधानांनी सरकारची बाजू समजून देण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजप नेत्यांचं त्यामुळे समाधान झाले नाही.

त्यामुळे कोणताही तोडगा न निघता बैठक आटोपण्यात आली. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी स्वतःहून बोलावलेल्या या बैठकीला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि अरूण जेटली उपस्थित होते. बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होईल तेव्हाच कोळसा घोटाळ्यातील हरवलेल्या फाईल्सबाबत काय पवित्रा घ्यायचा निर्णय भाजप घेणार आहे.

Leave a Comment