स्टार प्रवाहने ’महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार – छोटे मास्टर्स’ या नव्या डान्स रिऍलिटी शोची घोषणा केली. महाराष्ट्रभरातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील लहान मुलांमधील नृत्यकौशल्य ’महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार’ या किताबाने गौरवण्यात येणार आहे. या अनोख्या व्यासपीठावर लहान नर्तकांना भारतीय आणि पाश्चिमात्य नृत्य प्रकारांपैकी त्यांच्या आवडीचा नृत्य प्रकार सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार – छोटे मास्टर्स
ही स्पर्धा सोलो, जोडी आणि ग्रुप सादरीकरणांकरिता खुली आहे. ’महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार – छोटे मास्टर्स’ या शोचे सूत्रसंचालन चिन्मय उदगीरकर करणार आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सॅव्हिओ बार्नेस, विश्वास नाटेकर आणि लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर या शोचे परीक्षक असणार आहेत. या प्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध अभिनेत्री व परीक्षक अमृता खानविलकर म्हणते, ‘या शोचा एक भाग बनून मी याचा खूप आनंद घेणार आहे. पण, एका परीक्षकाची भूमिका पार पाडणे हे माझ्याकरिता अत्यंत आव्हानात्मक काम आहे. तसेच एक परीक्षक म्हणून मी दर्शकांचे विचार व भावना व्यक्त करेन.
पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई येथे घेण्यात आलेल्या ऑडिशन्समध्ये ७००० मुलांनी सहभाग घेतला. यामधून १२० उमेदवार मुलांची निवड करण्यात आली. हा शो २३ सप्टेंबर २०१३ पासून दर सोमवार व मंगळवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
