तरुणा’ना विश्वासात घेतले तर देशांत मोठे बदल शक्य – अजय देवगण

पुणे, – देशातील युवक आणि माध्यमे यांच्यात मोठी ताकद आहे. त्यांनी ठरवलं तर देशामध्ये अनेक चांगले बदल होऊ शकतात. प्रत्येक व्यवसायासाठी प्रशिक्षणाची गरज असेत, तसेच राजकारणात येण्यासाठीही किमान शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली पाहिजे, असे मत चित्रपट अभिनेता अजय देवगण याने मंगळवारी येथे व्यक्त केले. सत्याग‘ह चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या चित्रपटातील कलाकारांनी एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांष्ही संवाद साधला यावेळी अजय बोलत होता. एमाअयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा. राहुल कराड यावेळी उपस्थित होते.

प्रकाश झा म्हणाले, आज देशाच्या एकूण लोकसं‘येपैकी 65 टक्के युवक आहेत. देशातल्या या युवाश्‍नतीला योग्य दिशा दिली पाहिजे. या कार्यात भारतीय छात्र संसदेसारखे उपक‘म महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. आपली जबाबदारी ओळखून युवकांना कोणत्याही भ‘ष्टाचाराला बळी न पडता, न घाबरता स्वत:पासून बदल केले पाहिजेत.

अर्जुन रामपाल म्हणाला, शासकीय कार्यालयातील भ‘ष्टाचारामुळे अनेक नागरीक त्रासून गेले आहेत. आज तेच लोक आंदोलने करत आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये एक नायक आणि खलनायक असतो, त्यापैकी कोणाला जागृत ठेवायचे, हे आपल्या विवेकानेच ठरवायचे असते. ’महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे जो बदल आपल्याला हवा आहे, तो बदल स्वत:मध्ये सर्वप्रथम केला पाहिजे.

Leave a Comment