पुण्यात मुक्या महिलेवर रूग्णालयात बलात्कार

पुणे – पुण्याच्या भोसरी भागातील महापालिका रूग्णालयात एका गतिमंद व बोलू न शकणार्या- ३० वर्षीय महिलेवर रूग्णालयाच्या लिफ्टमध्ये वॉर्डबॉय व सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला अनाथाश्रमात राहणारी असून तिला ताप आल्याने वरील रूग्णालयात २६ ऑगस्ट रोजी दाखल केले गेले होते.तेथे दुसर्या वॉर्डात हलवायचे आहे असे सांगून रूग्णालयातील वॉर्डबॉय व सुरक्षा रक्षकाने या महिलेला २९ ऑगस्ट रोजी लिफ्टमध्ये नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. या महिलेला रूग्णालयातून ३१ ऑगस्ट रोजी सोडण्यात आल्यानंतर तिने आश्रमातील व्यवस्थापकांना घडलेल्या प्रकार सांगितला व त्यानंतर पोलिस केस करण्यात आली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून संबंधित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.