केदारनाथाची पूजा ११ सप्टेंबरपासून सुरू

डेहराडून – जून महिन्यात ऐन यात्रा काळात उत्तराखंड येथील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ येथे आलेल्या महाभयंकर प्रलयानंतर येत्या ११ सप्टेंबरपासून मंदिरातील शिवलिगाची नियमित पूजा सुरू होत असल्याचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी जाहीर केले आहे. सकाळी सात ते दुपारी ११ या वेळेत ही पूजा नियमित सुरू होत असली तरी तीर्थयात्रा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्यापी झाला नसल्याचे समजते.

दिवाळीत ही मंदिरे बंद केली जातात. तोपर्यंत मंदिरात नियमित पूजा केली जाणार आहे असे सांगून बहुगुणा म्हणाले की, मंदिर समितीने पदाधिकारी व पुजारी अशी २४ लोकांची यादी सादर केली आहे. या समितीवर पूजा अर्चेची जबाबदारी राहणार आहे. मात्र भाविकांसाठी केदारनाथ दर्शन पुन्हा सुरू करायचे वा कसे याचा निर्णय ३० सप्टेंबर रोजी होणार्यास बैठकीत घेतला जाणार आहे. त्यानंतरच पुन्हा तीर्थयात्रा सुरू होऊ शकेल.