टीम इंडियाचे अव्वलस्थान कायम

दुबई- टीम इंडियाचे आयसीसी वनडे आणि टी-२० क्रमवारीत पहिले आणि तिसरे स्थान कायम राखले आहे. फेब्रुवारीमध्ये २०१३ मायदेशात इंग्लंड हरवून अव्वल रँकिंग मिळवणा-या टीम इंडियाने १२३ रेटिंग्ज गुणासह पहिले स्थान राखले आहे. टीम इंडियापाठोपाठ ऑस्ट्रेलिया ११४ गुण आणि इंग्लंड ११२ गुण आहे. टी-२० क्रमवारीत १२१ गुणांसह टीम इंडिया तिस-या स्थानावर आहे. यामध्ये१ श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. दुस-या क्रमांकावर पाकिस्तान आहे.

युवा फलंदाज विराट कोहलीने वनडे रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी कायम आहे. त्याच्यासह कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. फलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमला अव्वल स्थानी आहे. गोलंदाजीत टीम इंडियाच्या रवींद्र जडेजाने ७३३ गुण पहिला क्रमांक सोडलेला नाही.

अष्टपैलूंच्या यादीत जडेजाने तिसरे स्थान राखले आहे. टी-२० मध्ये कोहलीसह (सहावा) आणि सुरेश रैनाने (आठवा) पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. गोलंदाजीत पहिल्या २० गोलंदाजांमध्ये ऑफस्पिनर आर. अश्विन सोळावा एकमेव भारतीय आहे.