न्यूयॉर्क- सानिया मिर्झा व लिएँडर पेसकडून भारतीय टेनिसप्रेमींना मोठ्या अपेक्षा असणार आहेत. अमेरिकन ओपनच्या चौथ्या राऊंडमध्ये सानिया मिर्झा आणि चीनच्या झेंग जीनं अमेरिकन ओपनच्या दिमाखात प्रवेश केला. दहाव्या सीडेड सानिया-झेंग जोडीनं जर्मनीच्या ऍना लेना ग्रोएनेफेल्ड आणि चेक रिपब्लिकच्या क्वेटा पेश्के जोडीचा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला.
अमेरिकन ओपनच्या वुमेन्स डबल्सच्या पुढच्या राऊंडमध्ये धडक मारण्यासाठी पेस-झेंग जोडीला फारसे कष्ट पडले नाहीत. बोपन्ना, भूपती आणि सोमदेवचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता सानिया मिर्झाकडून भारतीय टेनिसप्रेमींना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
दुसरीकडे भारताच्या लिएँडर पेसने अमेरिकन ओपनच्या मेन्स डबल्सच्या मॅचमध्ये चौथ्या राऊंडमध्ये धडक मारली. पेसने आपला चेक रिपब्लिकचा साथीदार लाडेक स्टेपानेकसह खेळतांना फ्रान्सच्या मायकल लॉड्रा आणि निकोलस माहूतवर मात केली.
अतिशय चुरशीच्या या लढतीमध्ये चौथे सीडींग मिळालेल्या पेस आणि स्टेपनेकने सीडेड लॉड्रा आणि माहूत जोडीला पराभवाची चव चाखायला लावली.