जळगाव पलिका निवडणूकीत चूरस

जळगाव- महानगरपालिकेसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली.सध्याच्या माहितीनुसार, खान्देश विकास आघाडी ३२, भाजप १९, राष्ट्रवादी १०, काँग्रेस ००, मनसे ०४ व अपक्ष ०६ जागांवर आघाडीवर आहेत. आकडेवारी पाहता सर्व पक्षांमध्ये जळगाव मनपासाठी चुरशीची लढत सुरू असल्याचे चित्र आहे. तरीसुद्धा खान्देश विकास आघाडीने बाजी मारली असली तरी बहूमतापासून ते अजून दूर आहेत.

रविवारी ५५ टक्के मतदान झाले होते. सध्याची आकडेवारी पाहता सर्व पक्षांमध्ये जळगाव मनपासाठी चुरशीची लढत सुरू असल्याचे चित्र आहे. तरीसुद्धा खान्देश विकास आघाडीने जळगाव मनपाच्या एकूण ७५ जागांपैकी २६ जागांवर आघाडी घेतली असून विजयी उमेदवारही घोषित होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस मात्र बिकट अवस्थेत सापडलेला आहे. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळविता आलेली नाही.

खानदेश विकास आघाडीने ३२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप १९ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादीच्या हातीही १० जागा लागल्या आहेत. मनसेनेही चांगली कामगिरी केली आहे. कारण मनसेचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. तर अपक्ष ६ ठिकाणी आघाडीवर आहेत.