छोटया भूमिका नकोत- परिणिती चोप्रा

आगामी काळात परिणिती चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘शुद्ध देसी रोमान्स’ येत्या शुक्रवारी ६ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. तिच्या यापूर्वीच्या सिनेमाप्रमाणे शुद्ध देसी रोमान्सदेखील यश प्राप्त करेल अशी आशा आहे. लेडीज वर्सेस रिकी बहल’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी परिणिती चोप्रा तिच्या बहिणीप्रमाणेच सिनेसृष्टीत यश प्राप्त करत आहे. मला छोटया भूमिका नकोत म्हेणून परिणितीने मोठ्या स्टार्ससोबतच्याम भूमिकेला नकार दर्शविला आहे.

परिणिती म्हणाली, ‘रणबीर सिंग, अर्जुन कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत काम करायाला आवडते. गेल्या काही दिवसात छोटया भूमिका नकोत म्हणून मोठया अभिनेत्यांसोबतचे सिनेमास नकार दिला आहे. मला अनेक सिनेमामध्ये मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याच्या संधी येत होत्या. पण, दुर्देवाने मी त्या नाकारल्या. मला वाटते, मोठे कलाकार असणा-या सिनेमामध्ये मला जास्त काही काम करण्यासाठी नसणार. केवळ १० मिनिटांची भूमिका, नेहमीची गाणी आणि नृत्य असणारे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही. सिनेमातील भूमिका महत्वाची असणे माझ्यासाठी गरजेचे आहे.

अनेक मसाला आणि अॅक्शन सिनेमाचे प्रस्ताव माझ्याकडे आले होते. त्यात मला अधिक पैसे कमविण्यास मिळाले असते. मात्र, आता हे सिनेमे प्रदर्शित झाले असून ते न केल्याचा आनंद होत आहे आणि त्यांना नाकारल्याची खंतही माझ्या मनात नाही, असेही परिणिती म्हणाली.

Leave a Comment