प्रियंकानेही साधला माध्यमांवर निशाणा

बॉलीवूडच्या बाला आजकाल प्रसारमाध्यमांवर जरा जास्त नाराज होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी स्पेनमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेलेली अभिनेत्री कतरिना कैफची रणबीर कपूरसोबत समुद्रकिनारी बिकिनीतील छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ही छायाचित्रे पाहून प्रचंड संतापलेल्या कतरिनाने माध्यमांना लगोलग पत्र पाठवून आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली होती. कतरिनाचाच कित्ता गिरवत तिची प्रतिस्पर्धी प्रियंका चोप्रानेही माध्यमांवर निशाना धरला अहे.

प्रियंकाच्या या नाराजीचे कारण खरेतर कतरिनाएवढे मोठे नाही, तरीही तिने आगपाखड केली आहे. संजय लीला भन्साळीच्या आगामी राम लीला चित्रपटामध्ये प्रियंका आयटम साँग करणार असल्यासंबंधी गेली काही दिवसांपासून सातत्याने छापून येत आहे. आता त्यात भडकण्यासारखे काहीच नाही. ऐश्‍वर्या राय-बच्चन बाबतही काही दिवसांपूर्वी असेच बोलले जात होते; पण प्रियंकाने ते जरा जास्तच मनाला लावून घेतले आहे. या सगळ्या गोष्टी बकवास असून आपण राम लीलामध्ये आयटम साँग करत नसल्याचा खुलाला तिने केला अहे. तिने सांगितले की, भन्साळीसोबतमी भारताची ऑलिम्पिक विजेती मुष्टियोद्धा मेरी कॉमच्या जीवनावरील चित्रपटात काम करत आहे.

Leave a Comment