मुंबई गँगरेप आरोपी पुन्हा शक्ती मिलच्या आवारात

मुंबई- मुंबई गँगरेप प्रकरणातील पाचही नराधम बुधवारी पुन्हा एकदा शक्ती मिलच्या आवारात पोचले आहेत. त्या भयानक दिवशी नेमके काय काय घडले यासाठी चांद बाबू सत्तार शेख, विजय जाधव, सिराज रेहमान कासीम बंगाली, सलीम अन्सारी या पाचही नराधमांना पोलिसांनी आज ऑन दी स्पॉट नेले आहे. पोलीस गुन्ह्याची सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन घेण्यात येणार आहे.

गेल्या गुरूवारी महालक्ष्मीतील शक्ती मिल कंपाऊंड येथे एका इंग्रजी मासिकातील छायाचित्रकार तरुणी आणि तिचा एक सहकारी छायाचित्र काढण्यासाठी गेले होते. या दरम्यान पाच नराधमांनी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता.

बुधवारी पोलीस गुन्ह्याची सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन घेत आहेत. त्याुसाठी मुंबई गँगरेप प्रकरणातील पाचही नराधमांना पोलिसांनी आज ऑन दी स्पॉट नेले आहे.या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून देशाची आर्थिक राजधानी मुंबई महिलांसाठी सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment