दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच – शिंदे

नवी दिल्ली – मुंबई 1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य दाऊद इब्राहिम आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हफीज सइद पाकिस्तानातच असल्याचे सुतोवाच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. दाऊदच्या प्रत्यार्पणासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे शिंदे यांनी लोकसभेत लेखी पत्राद्वारे सांगितले.

सइद आणि दाऊदच्या प्रत्यार्पणासंदर्भात शिंदे यांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कराची प्रांतात लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे खासदार अनंत कुमार यांच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

पुरवणी प्रश्नोत्तराच्या कालावधीत दहशतवादाच्या मुद्दयावर काँग्रेस सरकार कमकूवत असल्याचे विधान विरोधकांनी केले होते. त्यावर शिंदे यांनी विरोधकांना चोख प्रत्यूत्तर दिले. भाजप सत्तेवर असताना त्यांनी दहशतवादाविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.मात्र यूपीए सरकारच्या काळात दहशतवादाला तोंड देण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत, असे शिंदे म्हणाले.

Leave a Comment