रत्नागिरीत मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार : 6 जणांना अटक

रत्नागिरी – मुंबईत महिला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्काराने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना रत्नागिरीतही मनोरूग्ण तरुणीवर तीच्याच गावातील सहा तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत या सहा जणांनी तीच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या सहा जणांना अटक केली आहे. पिडीत मनोरूग्ण तरूणीला जिल्हा मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आणि तिची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी पोलिसांनी विवेक कृष्णा होरंबे, गणेश शंकर होरंबे, सुरज विजय होरंबे, राकेश रविंद्र शिंदे, राजन देवजी होरंबे आणि नितीन धरमा होरंबे अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे असून हे सर्वजण 18 ते 21 वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले यापैकी सर्वजण नोकरीला असून एकजण महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पिडित तरूणीच्या वडीलांचे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले. यानंतर तीची मानसिक स्थिती ढासळू लागल्याने ती तीच्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. पिडित तरुणीचे मानसिक संतुलन बिघडल्याने 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ती रत्नागिरी-पानवल मार्गावरील पानवल पिकअप शेड येथे बसली होती. यावेळी सहा जणांच्या टोळक्याच्या ती निदर्शनास पडली. तीच्या एकाकीपणाचा आणि असहायतेचा फायदा घेत त्या सहा जणांनी महामार्गावरील पिकअप शेडच्या पाठीमागेच पिडित तरूणीवर बलात्कार केला. या घटनेचा अधिका तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजीव मुठाणे हे करीत आहे.

Leave a Comment