रेल्वेत अमेरिकन महिलेवर हल्ला करणार्‍यास अटक

मुंबई – रेल्वेत अमेरिकन महिलेवर हल्ला करणारा आरोपी राजकुमार तिवारीला पोलिसांनी अटक केली आहे. राजकुमार तिवारीने पोलिसांना या हल्ल्याची कबुली दिली आहे. चर्चगेटहून बोरिवलीकडे जाणार्‍या लोकलमध्ये या आरोपीने अमेरिकन महिलेवर मरिन लाइन्स ते चर्नी रोड दरम्यान लोकलमध्ये ब्लेडने हल्ला केला होता. यात ही महिला जखमी झाली होती. तसेच तिचा आयफोनही चोरला होता.

अमेरिकन महिलेने चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने या महिलेवर ब्लेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर सुरूवातीला नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले. रविवारी 18 ऑगस्ट 2013 रोजी मरिनलाईन्स ते चर्नी रोड दरम्यान हा हल्ला झाला होता.
दरम्यान, तिवारीने या महिलेचा पळवलेला मोबाईल फोन एका महिलेला विकला आहे. पोलिसांना या महिलेचा छडा लागला असून, लवकरच तिला ताब्यात घेतले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment