शाहरुख ट्विट् करणार एसएमएसवरून

सोशल मीडियाद्वारे असंख्य चाहत्यांपर्यंत ट्विटस पोहोचविण्यासाठी बॉलीवूड बादशहा शाहरुख खानने नवीन सेवा उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही मोबाइलवरून एक क्रमांक फिरवून मिस कॉल केला की तुमच्या मोबाइलवर शाहरुखने केलेले ट्विट्सचे एसएमएस मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारे चाहत्यांशी संपर्क साधणारा जगभरातला तो पहिला सेलिब्रिटी ठरला आहे.

आतापर्यंत आवडत्या सेलिब्रिटींना ट्विट्रवर फॉलो करण्यासाठी इंटरनेट सुविधेची गरज भासत होती अथवा तुमच्या संगणकावरील इंटरनेटद्वारे फॉलो करावे लागत होते. परंतु, इंटरनेट न वापरणा-या तसेच इंटरनेटची सुविधा मोबाइलवर न घेणा-या शाहरुख खानच्या चाहत्यांना आता त्याचे ट्विट्स मिळण्याची सुविधा झिप डायलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

०९०१५५००५५५ या क्रमांकावर मिस कॉल करून शाहरुखचे ट्विट्स एसएमएसद्वारे मिळू शकतील.
चाहते आणि फॅन क्लब यांच्याशी डिजिटल माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर संपर्कात राहण्याचा प्रयत्न शाहरुख खान करतोय. सर्वसाधारण फक्त मूलभूत सोयी असलेले मोबाइल वापरणा-या सर्वसामान्यनाही ट्विटरवर खाते न उघडता शाहरुख खानचे ट्विट्स एसएमएसद्वारे मिळणार आहेत.

Leave a Comment