राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका

नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यांकनी मुंबईमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेला परप्रांतीयांचे महाराष्ट्रात येणारे लोंढे जबाबदार आहेत असे म्हाटले होते. या राज ठाकरे या घटनेचे राजकारण करीत असल्याचा आरोप विविध पक्षांनी केला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले, ‘परप्रांतीयांचा समावेश असो किंवा नसो, दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे.’ सत्तेवर आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित करू, या ठाकरे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, ‘नागरिक राज ठाकरे यांना कधीही सत्तेवर येऊ देणार नाहीत.’ परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा असून कुणाच्याही एका वक्तव्याने घटनेचे स्पष्टीकरण देता येणार नसल्याचे म्हटले आहे.

ठाकरे यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला म्हणाले, ‘राज ठाकरे या विषयाचे पुन्हा राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी एकाला अटक केली असून, इतरांनाही अटक होण्याची शक्यता आहे.’ संजय निरूपम म्हणाले, ‘अत्यंत वेदनादायी घटनेतून शहर जात असताना एखाद्या समाजाला दुखवणा-या वक्तव्याची काहीही गरज नव्हती. एखाद्या समाजातील काही घटकांमुळे पूर्ण समाजाला वाईट ठरवू नये.’

Leave a Comment