श्रीलंकेतील यादवीचे प्रथमच शुट-जॉन अब्राहम

गुप्तहेर संस्थांचे काम कसे चालते याची झलक दाखविण्याबरोबरच श्रीलंकेत झालेल्या यादवी युद्धाचे हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर चित्रण करण्यात आलेला ‘मद्रास कॅफे’ हा पहिलाच चित्रपट आहे, असे सांगून श्रीलंकेतील यादवी युद्धाच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती याचे दर्शन घडविताना यातील कोणत्याही एका घटकाच्या बाजूने सिनेमा केलेला नाही, असे विधान अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहमने एका कार्यक्रमात बोलताना केले.

जॉन अब्राहम म्हणाला, ‘मद्रास कॅफे’ हा सिनेमा राजीव गांधी हत्येच्या कटामागची पाश्र्वभूमी विषद करणारा आहे, त्यावर आधारित आहे हे समजल्यावर अर्थातच सिनेमाच्या कथानकाशी निगडित झालो. चित्रपटाचे क्लायमॅक्सचे चित्रण हे खूप आव्हानात्मक ठरले. यादवी युद्ध हा सिनेमाचा मूळ विषय आहे. आतापर्यंत हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर आपल्या शेजारील देशांतील यादवी युद्धाचा कालखंड, त्यात निरपराधांचे हकनाक गेलेले बळी, दु:ख याचे शुट पहिल्यांदाच करण्यात आले आहे.’

दिग्दर्शक शूजित सरकार म्हणाले, ‘हा सिनेमा करताना सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे श्रीलंकेमधील यादवी युद्धातील घटक आणि राजकीय स्तरावरील शूट करताना कोणत्याही घटकापैकी कोणाचीही बाजू न घेता, कुणाचाही कैवार न घेता त्रयस्थपणे शूट चित्रण करणे हेच होते. हॉलीवूडच्या जेएफके किंवा आगरे, बॉडी ऑफ लाईज या पद्धतीचा सिनेमा आम्ही केला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकाला समजेल असा पद्धतीचे चित्रण, मांडणी केली आहे.’

Leave a Comment