मुंबई गँगरेपप्रकरणातील सर्वच नराधमाला अटक

मुंबई- महिला पत्रकार गँगरेपप्रकरणातील सर्वच नराधमाला अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान या आरोपीला अटक करण्यात आली. तर पाचवा आरोपी सलीम अन्सारीला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्लीमध्ये अटक केली आहे.काल संध्याकाळी तिस-या आरोपीलाही महालक्ष्मी परिसरात अटक केली आहे.

या तिघांना रविवारी किला कार्टात हजर केले जाणार आहे. याआधी आरोपींची मेडिकल टेस्ट करण्यात आली.दरम्यान, एन एम जोशी पोलिस ठाण्याकडून हा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. क्राईम ब्रँचचे अडिशनल सीपी निकीत कौशिक, डिसीपी सत्यनारायण चौधरी आणि एसीपी दिपक कातकडे हे जातीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान आरोपी चांद शेख आणि विजय जाधवला भोईवाडा कोर्टात हजर केलं असता त्यांना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला.

Leave a Comment