आमदार कदमांवर विनयभंगाचा गुन्हा

नाशिक – टोल नाक्यावरील महिला कर्मचा-यांना शिवीगाळ केल्याने आमदार अनिल कदमांवर रविवारी विनयभंग, धमकावणे आणि नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामु आमदार अनिल कदमांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

गुरुवारी नाशिकमधील पिंपळगाव टोल नाक्यावर स्थानिक आमदार कदम यांच्याकडे टोल नाक्यावरील कर्मचा-यांनी टोलचे पैसे मागितले. यामुळे आमदार कदम यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कर्मचा-यांना शिवीगाळ केली. बूथवरील महिला कर्मचा-यांनादेखील त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. कदम समर्थकांनी टोलनाक्याची तोडफोडदेखील केली होती.

याप्र्काराचे व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर प्रसारीत झाल्याने कदम यांना शनिवारी सकाळी पक्षश्रेष्ठींकडे आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता कदम यांच्यावर टोल कंपनीच्या कर्मचा-यांनी विनयभंग, मारहाण, धमकी देणे, नुकसान करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता कदम यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment