सहकारी महिलेवर पोलिसाचा बलात्कार

बुलडाणा – घटस्फोटीत महिला पोलीस कर्मचा-यांची फसवणूक सहकारी पोलीस कर्मचा-यानेच करून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उघडकीस आली. लग्नाचे आमीष दाखवून सतत दोन वर्ष बलात्कार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे.

एका महिला पोलीस कर्मचा-यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. खामगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पंकज सीताराम तायडे या पोलीस कर्मचा-याने मला लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्ष माझ्याशी शारीरिक सबंध ठेवले. गेल्यावर्षी त्याच्यापासून दिवस सुद्धा राहिले. ज्या वेळी मी त्याला लग्नाचे विचारले तर त्याने नकार देत दुस-या महिलेशी लग्न केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

पिडित महिलेने मेहकर पोलीस स्टेशनला तायडे विरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी तायडे विरुद्ध विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पंकज तायडे याची उपनिरीक्षकपदी निवड झाली असून सध्या तो नाशिक येथे प्रशिक्षण घेत आहे. पिडीत महिला पोलीस कर्मचारी ही घटस्फोटीत आहे.

Leave a Comment