मुंबई गँगरेप प्रकरण: दुसरा आरोपी गजाआड

मुंबई – मुंबई गँगरेप प्रकरणी पोलिसांनी शनिवारी सकाळी मदनपुरा परिसरातून दुस-या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आणाखी तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांलच्याज मागावर आहेत. शुक्रवारी पकडण्यात आलेल्या आरोपीने चौघाची नावे सांगितली आहेत. पीडित मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

मुंबई पोलिस आयुक्त सत्ययपाल सिंग म्हनाले, ‘एलिट गुन्हे शाखेने या दुस-या आरोपीला शनिवारी सकाळी मदनपुरा परिसरातून दुस-या आरोपीला ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक दबाव आणि राग यामुळे विशेष ट्रॅकची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणाखी तीन आरोपी फरार असून पोलिसाचे पथक त्यांच्या मागावर आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.’

मुंबईतील महालक्ष्मीजवळ शक्ती मिल परिसरात एका मासिकाच्या महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. महिलेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शुक्रवारीच एका आरोपीला अटक करण्यारत आली होती.

Leave a Comment