डॉ. दाभोळकर यांचे मारेकरी अजून मोकाटच

पुणे: डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आता पाच दिवस उलटून गेले असून त्यांचे मारेकरी अजून मोकाटच आहेत. अजूनही पोलिसांच्या तपासाची दिशा ठरलेली नाही. बाईकचा नंबर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिला असला तरी हा नंबर पूर्ण नाही. जो नंबर होता त्या सिरिअलच्या जवळपास ४५ गाड्या आहेत. त्या सगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. पण तरी ते कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत.

पोलिसांनी ओंकारेश्वर पूलाजवळच्या कॉसमॉस बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र हे फुटेजही काहीसे अस्पष्टच असल्याने मारेक-यांचा पत्ता लागत नाही. हत्येच्या तपासानंतर पोलिसांनी पुण्यातल्या हिंदुत्वावादी संघटनेच्या पदाधिका-यांची चौकशीही सुरु केली. मोबाईल टॉवरच्या आधारे त्या दिवशीचे संभाषण ट्रॅक करण्याचाही प्रयत्न होत आहे.

डॉ. दाभोळकरांच्या हत्या्प्रकरणाची संवेदनशीलता पाहता पोलिसांनी आतिशय सावधानतेने तपास करण्याची गरज आहे. फक्ता मारेक-यांनाच नव्हेत तर हत्येचा सुनियोजीत कट रचणा-यापर्यंत पोहचणेही आवश्यक आहे. त्यामुळे तपासाला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Leave a Comment