देशात 44 हजार कोटींचे धान्य जाते वाया – पवार

दिल्ली – देशात अन्नधान्य साठवण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा नसल्याने दरवर्षी 44 हजार कोटी रूपयांचे अन्नधान्य, फळे आणि भाज्या वाया जातात, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यसभेत शुक्रवारी दिली. देशात प्रतिवर्षी 13 हजार 309 कोटी रूपयांची फळे व भाज्यांची नासाडी होते. तर तांदूळ, गहू, तृणधान्ये आणि इतर धान्ये असे मिळून 44 हजार कोटी रूपयांच्या धान्याची नासाडी होते, असे पवार यांनी सांगितले.

अन्नधान्यांच्या साठयाची क्षमता वाढवण्यासाठी यापूर्वीच पावले उचलले असल्याचे पवार म्हणाले. देशातील किरकोळ बाजारात परकीय गुंतवणूक होणार असल्याने, अन्नधान्य साठवण्यासाठी शीतगृहांची पायाभूत सुविधा निर्माण होणे अपेक्षित आहेच. मात्र पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी सांगितले.