अन ऐश्वर्या पत्रकारांवर चिडली

सहजा-सहजी बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय- बच्चन कधीच चिडत नाही. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ती पत्रकारांवर खूपच चिडली होती. तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्याने ऐश्वर्या चिडली असल्याचे समजते.

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय- बच्चन आपल्या मोहक हास्यासाठी आणि शब्दचातुर्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर तिचा संयम सुटला आणि ती चिडली. ‘ज्येष्ठ अभिनेत्रींना दिग्दर्शक केवळ ‘आयटम साँग’साठीच का विचारणा करतात ?, असा थेट प्रश्न ऐश्वर्याला कोणीतरी विचारला होता. या प्रश्नामुळे तिच्या चेहरा पडला होता.

ऐश्वर्या ‘ज्येष्ठ’ या शब्दामुळे चिडली की ‘आयटम साँग’ या शब्दावर हे मात्र समजले नाही. संजयलीला भन्साळीच्या आगामी ‘रामलीला’ या चित्रपटात ‘आयटम साँग’ करण्यासाठी ऐश्वर्या ला विचारणा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. याआधी ऐश्वर्यानेही ‘शक्ती’ आणि ‘ बंटी और बबली’ या चित्रपटांमध्य डान्स केला आहे. त्यामुळे तू पुन्हा ‘आयटम साँग’ करणार का, असाच प्रश्न होता. त्यामुळेच ती पत्रकारांवर खूपच चिडली होती.