राज्यातील कायदा,सुव्यवस्थेचा बोजवारा-फडणवीस

मुंबई: ‘राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईला सेफ सिटी बनवण्याचं आश्वासन, आर आर पाटील यांनी दिलं होते. मात्र मुंबई रेप सिटी होत आहे’, त्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याची जबाबदारी स्वींकारून तत्काकळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबईतील परळ भागात गुरुवारी महिला छायाचित्रकार (फोटोजर्नालिस्ट) म्हणून काम करत असलेल्या एका महिलेवर मुंबईतील सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा सर्वस्‍तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पुण्यामतील दाभोलकर यांच्या हत्येची घटना असो अथवा मुंबईतील सामूहीक बलात्काराची घटना असो त्यामुळे तुम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नीट सांभाळू शकत नसाल, तर तुम्ही पदावरून हटायला हवे, असे फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.

Leave a Comment