बलात्काराविषयी गृहमंत्री पाटील यांचे मौन

मुंबई – पुण्यात भररस्त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकारंची हत्या करणारे आरोपी अद्याप मोकाटच आहेत. त्यात काल संध्याकाली साडेसहाच्या सुमारास मुंबईत तरुणीवर झालेल्या सामूहीक बलात्काराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मौन पाळले आहे. याबाबत आयुक्त स्टेटमेंट करतील, असे सांगून त्यांनी जबाबदारी आयुक्तांवर टाकली.

मुंबईत एका महिला न्यूज फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली. ही तरुणी एका मासिकात फोटोग्राफर म्हणून काम करत आहे. ऑफिसने दिलेले फोटोशूट करण्यासाठी ही तरूणी गेली असता तिच्यावर ४ ते ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. सध्या तिच्यावर जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून पोलिसांनी पाच जणांवर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

या बलात्काराविषयी माहिती घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या बाबतीत बोलणे टाळले. एका गंभीर गुन्हाची नोंद झाली आहे. तपास योग्य गतीने सुरू झाले आहे. स्वत: आयुक्त याबाबत स्टेटमेंट करतील, असे सांगून त्यांनी जबाबदारी आयुक्तांवर टाकली.

Leave a Comment