महिला छायाचित्रकारावर मुंबईत सामूहिक बलात्कार

मुंबई- परळ भागात महिला छायाचित्रकार (फोटोजर्नालिस्ट) म्हणून काम करत असलेल्या एका महिलेवर मुंबईतील सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. लोअर परळ आणि महालक्ष्मी यामधील रेल्वेमार्गालगतच्या भागातील शक्ती मिल्स येथे रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या तरुणीस जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला काही अंतर्गत दुखापती झाल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपींच्या शोधासाठी रात्री उशिरा शोधमोहीम सुरू करण्यात आली.

याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही पीडित महिला छायाचित्रे काढण्यास शक्ती मिलनजिकच्या परिसरात गेली होती. त्यावेळी काही तरुणांनी तिला धमकावून जबरदस्तीने निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी सुमारे १८ पोलिस पथक तयार केली आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत पोलिसांनी तब्बल २० संशयीत तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पिडीत तरुणीने पाच पैकी दोन नराधम आरोपींची नावे रुपेश आणि जावेद असल्याचे पोलिसांना सांगितली आहेत.

Leave a Comment