सुशांत- अंकिता करणार लवकरच लग्न

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत पती-पत्नीची भूमिका केलीली छोटया पडदययावरील जोडी सुशांत सिंह राजपूत प्रेयसी अंकिता लोखंडेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ‘काय पो छे’ सिनेमामुळे प्रसिद्ध झालेला सुशांत सिंह राजपूतने आगामी काळात लवकरच लग्न करणार असल्यानची कबुली त्याने दिली. सुशांतचे गेल्या चार वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत प्रेमसंबंध आहेत.

‘काय पो छे’ सिनेमाच्या यशांनतर सुशांतकडे सध्या सिनेमाची रांग लागली आहे. यात आदित्य चोप्राचा ‘शुद्ध देसी रोमान्स’, आमिर खान अभिनीत ‘पीके’ आणि दिबाकर बॅनर्जीचा ‘डिटेक्टीव ब्योमकेश बख्शी’ यांचा समावेश आहे.

याबाबत बोलताना सुशांत म्हणाला, ‘सध्या मी आणि अंकिता आम्ही खूप खूश आहोत. आमचे लग्न केव्हाही, यावर्षी किंवा पुढच्यावर्षी होऊ शकते. अंकिता माझ्या जीवनातील स्थिरतेचे कारण असून तिने नेहमीच मला साथ दिली आहे. तिच्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे आणि जेव्हा काहीही अडचण असते तेव्हा ती मला सांभाळून घेते. ती माझ्या सिनेमाबाबत फार जागरुक असून त्याबाबत ती मला मार्गदर्शन करते.’

Leave a Comment