लंडन- अशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत शेन वॉटसनने शतकाच्या बळावर शतक ठोकल्यायने कांगारूची दमदार सुरूवात झाली आहे. वॉटसनने शतक ठोकल्याळने ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ४ बाद ३०७ धावा काढल्या होत्या. त्या वेळी वॉटसन १७६ आणि मधल्या फळीचा फलंदाज सिडल १८ धावांवर खेळत होते.
अशेस मालिकेत इंग्लंडकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर सुरुवातीच्या चारही कसोटीत अपयशी ठरलेल्या शेन वॉटसनवर सर्वत्र जोरदार टीका झाली. मात्र, वॉटसनने शतक ठोकून सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले. पाचव्या षटकात डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर शेन वॉटसन खेळपट्टीवर आला. त्याने सलामीवीर क्रिस रोजर्ससोबत दुस-या विकेटसाठी १०७ धावांची शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. याशिवाय त्याने कर्णधार मायकेल क्लार्कसोबत तिस-या विकेटसाठी २६आणि स्टीव्हन स्मिथसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने त्याने झुंजार शतक ठोकले. वॉटसनने ११४ चेंडूंत एक षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या सामन्यातही फ्लॉप झाला. तो अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. त्याला पाचव्या षटकात अँडरसनने यष्टिरक्षक मॅट प्रायरकरवी झेलबाद केले. दुसरा सलामीवीर रोजर्सने २३ धावांचे योगदान दिले. त्याला फिरकीपटू ग्रीम स्वानने स्लिपमध्ये जोनाथन ट्रॉटकरवी झेलबाद केले.