धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई- विधान परिषदेच्या एका जागेसाठी दोन सप्टेंबरला होणा-या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार धनंजय मुंडे यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज विधिमंडळ सचिवांकडे सादर केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यावेळी विधानभवनात उपस्थित होते. आता आगामी काळात गोपीनाथ मुंडे आता भाजपकडून काय रणनीती आखतात याकडे सवांचे लक्ष लागले आहे.

अलिकडेच भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देऊन धनंजय मुंडे राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने पुन्हा धनंजय यांनाच पक्षाचे उमेदवार केले आहे.

या निवडणुकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. निवडणूक झाल्यास दोन सप्टेंबरला मतदान करण्यासाठी राज्यभरातील आमदारांना मुंबईला यावे लागणार आहे. गोपीनाथ मुंडे आता भाजपकडून काय रणनीती आखतात याकडे सवांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment