पंतप्रधान कार्यालयातील संचालकपदी व्ही. शेषाद्री

हैदराबाद, – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी व्ही.शेषाद्री यांची पंतप्रधान कार्यालयातील संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी शेषाद्री यांना आज विशाखापट्टणम्च्या जिल्हाधिकारी पदावरून मुक्त करण्यात आले.

पंतप्रधान कार्यालयातील संचालक म्हणून त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. मूळचे कर्नाटकचे असलेले शेषाद्री आंध्र प्रदेश केडरच्या 1999 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत.