रुपयापेक्षा सरकारला खूर्चीची चिंता- मोदी

अ‍हमदाबाद- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली रुपयाची घसरण रोखण्यात मनमनोहन सिंग सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे सरकारला अर्थव्यवस्थेत स्वारस्य नाही, केवळ स्वतताच्यान खुर्च्या वाचवण्याची चिंता आहे, असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘सरकारला रुपयाच्या घसरणीची व अर्थव्यवस्थेची चिंता नाही. भारतीय रुपयाची आज सकाळीही आणखी घसरला, एका डॉलरमागे रुपयाची किंमत ६४ रुपये ११ पैसे झाली. डॉलरची वाढती मागणी व देशांतर्गत समभाग बाजारपेठेची काहीशी कमजोर सुरुवात यामुळे रुपयाची घसरण सुरूच असून ही घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत.’

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करीत नाही.गेल्या तीन महिन्यात रुपया खूपच घसरला असून सरकारने रुपया मजबूत करण्यासाठी काहीच केले नाही. जर रुपया असाच घसरत राहिला तर इतर देश भारताचा गैरफायदा घेत राहतील. नेतृत्व दिशाहीन असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, इतका गंभीर आर्थिक पेचप्रसंग येईल अशी कल्पना देशाने कधीच केली नव्हती पण जेव्हा अशा पेचप्रसंगात नेतृत्व दिशाहीन असते तेव्हा निराशा वाढते असेही ते यावेळी म्हणाले.