भंगार वेचणा-या मुलीवर बलात्कार

उल्हासनगर – भंगार वेचण्याचे काम करणा-या एका १९ वर्षीय मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला. ही घटना मंगळवारी रात्री उल्हालसनगर येथील पालिकेच्या अमन टॉकीजजवळील ट्रान्झिट कँपमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

अमन टॉकीजजवळ ट्रान्झिट कँपमध्ये रात्री एकच्या सुमारास कचरा वेचणा-या एका तरुणीला शेख, पूरन आणि सलमान या तरुणांनी जबरदस्ती ट्रान्झिट कँपमधील खोली मध्येा नेले. यावेळी तिच्याकवर तिघा जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसानी शेख रज्जाक खान याला अटक केली आहे. अन्य दोघेजण घटनेनंतर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अमन टॉकीजजवळ ट्रान्झिट कँपमध्ये रात्रीच्या वेळेस भिकारी, दारुडे घुसतात. पालिका मुख्यालयामागील अग्निशमन दलाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने अग्निशमन दलाला तात्पुरत्या स्वरूपात ट्रान्झिट कँपमध्ये हलवले आहे. मात्र त्यानंतरही लांबलचक आवारात पसरलेल्या ट्रान्सिट कँपमध्ये अनुचित प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भागात बंदोबस्तप वाढविण्याची गरज आहे.

Leave a Comment