नवी दिल्ली -आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून बनावट भारतीय चलनाचा पुरवठा केला जायचा, असा गौप्यस्फोट दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याने केला आहे. हे बनावट चलन इक्बाल काना भारतात पाठवायचा, असेही त्याने म्हटले आहे.

भारत-नेपाळ सीमेवर अलीकडेच अटक करण्यात आलेल्या टुंडाची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान तो महत्त्वाची माहिती उघड करत आहे. आता त्याने बनावट भारतीय चलनाच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकला आहे.
पाकिस्तानातील इस्लामाबाद आणि पेशावर शहरांमध्ये बनावट भारतीय चलनाची छपाई केली जायची. हे बनावट चलन आयएसआयमधील एक ब्रिगेडिअर कानाला पुरवायचा. हे बनावट चलन काना त्याच्या नेटवर्कच्या माध्यमातूून भारतात पाठवायचा. हे बनावट चलन कोट्यवधी रकमेच्या स्वरूपात असायचे, असे टुंडाने तपास अधिकार्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. काना हा बनावट चलनाच्या तस्करीतील सूत्रधार मानला जातो.