इशरत जहॉं प्रकरणातील नवे पुरावे

अहमदाबाद – अहमदाबादजवळील २००५ साली झालेल्या इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआय अधिकार्‍यांनी या संबंधात नवीन पुरावा सापडला असल्याचा दावा केला आहे. या पुराव्यामुळे या चकमकीसाठी रचण्यात आलेल्या कारस्थानाची तपशीलवार माहिती मिळू शकेल, असा दावा या अधिकार्‍यांनी केला आहे. हाती आलेला हा पुरावा तसा परिस्थितीजन्यच आहे. परंतु त्यामुळे ही चकमक घडली तेव्हा काही महत्वाचे अधिकारी नेमके कोठे होते याचा पत्ता लागणार आहे.

हा नवीन पुरावा हाती आल्यानंतर त्याच्या आधारावर पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असे या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. याआधी दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात सात अधिकार्‍यांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या हत्या, अपहरण, पुरावा दडपणे आदींच्या संबंधातील कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

हे आरोपपत्र दाखल करताना सीबीआयच्या अधिकार्‍यांनी पुरावा म्हणून काही ध्वनीङ्गिती ताब्यात घेतल्या आहेत आणि त्या सील करून न्यायालयाकडे दाखल केल्या आहेत. या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉं आणि जावेद या दोघांच्या बाबतीत बरीच माहिती या आरोपपत्रात देण्यात आलेली आहे. परंतु अन्य दोन पाकिस्तानी अतिरेकी जे या चकमकीत मारले गेले आहेत ते म्हणजे राणा आणि जोहर या दोघांविषयी या आरोपपत्रात पुरेशी माहिती नाही. त्याचबरोबर हे दोन पाकिस्तानी अतिरेकी गुजरातमध्ये का आले होते, त्यांचा हेतू काय होता यावरही ङ्गारसा प्रकाश या आरोपपत्रात टाकण्यात आलेला नाही.

Leave a Comment