औरंगाबाद निवडणूकीत काँग्रेसचे सुभाष झांबड विजयी

औरंगाबाद- औरंगाबाद – जालना स्थानिक स्वराज्य संस्था आमदारकीसाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुभाष झांबड विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजपचे उमेदवार तथा आमदार किशनचंद तनवाणी यांचा ७२ मतांनी पराभव केला. सुभाष झांबड यांना २६० मते मिळाली. तर किशनचंद तनवाणी यांना १८८ मते मिळाली. या मतमोजणी दरम्यान २१ मते बाद ठरली.या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी ५० कर्मचारी नियुक्त केले होते. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील एकूण १३ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानादरम्यान १०० टक्के मतदानाचा हक्क बजावला होता.

गेल्या वेळेसच्या निवडणूकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार किशनचंद तनवाणी तिरंगी लढतीत विजयी झाले होते. गेल्या वेळेस सुभाष झांबड यांना पराभव सहन करावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा झांबड यांनी या निवडणू‍कीत काढला आहे. या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

Leave a Comment