मनालीतून निघून आली प्रियंका

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘इन माई सिटी’ आणि ‘एक्सॉटिक’ या अंतरराष्ट्रीय सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. त्यानंतर आता प्रियंका चोप्रा ओलंपिक कांस्य पदक विजेती बॉक्सर मेरी कॉमच्या जीवनावर आधारित सिनेमा करीत आहे. या सिनेमात प्रियंका मुख्य भूमिका करीत आहे. या सिनेमाचे शूटिंग सध्या मनालीत सुरू आहे.

या सिनेमाच्या काही भागाचे शूटिंग मनाली येथे करण्यात आले. या सिनेमाच्या शूटिंगवेळी प्रियंका चोप्राला एका किडयाने चावले. त्यामुळे तिला त्याची एलर्जी झाली. या एलर्जीचा प्रियंकाला खूपच त्रास झाला. त्याचमुळे प्रियंकाने मनालीमध्ये शूट करण्यास नकार दिला. त्यामुळे ती शूट अर्ध्यावर सोडून मुंबईला परतली.

त्यामुळे मनालीमध्ये झाले नसलेल्या या सिनेमाच्या उर्वरित सीनचे शुटिंग मुंबई मधील फिल्मिस्तान स्टूडियोमध्ये पूर्ण करण्यात आले. प्रियंकाने मनालीमध्ये शूट दरम्यान झालेल्या या एलर्जीच्या किस्स्याची माहिती सर्वांना दिली.

Leave a Comment