सनीच्या पतीला आवडले नाही बॉलीवूड

आगामी काळात येत असलेल्या सिनेमात अभिनेत्री सनी लियोनच्या ‘जैकपॉट’ सिनेमात ‍तिचा पती डेनियल वेबर कैमियोची भूमिका करीत आहे. मात्र डेनियलला बॉलीवुडमध्ये करियर करण्याची इच्छा नाही. डेनियल पत्नी सनी लियोनचा मॅनेजर आहे. त्याशिवाय त्यावचा स्व‍ताचे फिल्म प्रोडक्शन हाउस आहे.

याबाबत अधिक बोलताना डेनियल म्हणाला, ‘कैजाद गुस्तादने आग्रह केल्याने मी त्यांच्या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला आहे, तसे पाहिले तर मला बॉलीवुडची आवड नाही. मला अभिनय करायचा आहे मात्र त्यासाठी मी अमेरिकेतील स्वचत प्रोडक्शन हाउस मध्ये व्यवसाय संभाळत काम करणार आहे. मला सनीच्या कामाची रूपरेषा ठरववी लागते.’

गेल्या काही दिवसांपासून डेनियल पत्नी सनीसोबत हिंदी भाषा शिकत आहे. व्यवसाय संभळनयासाठी हिंदी भाषा शिकत असल्याचे त्यांनी कबूल केले. एका विदेशी सिनेमात डेनियल रोल करीत आहे हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

Leave a Comment