बिग बॉस’मध्ये झळकणार गुरदीप, प्रत्युषा

‘बिग बॉस’च्या सातव्या भागाची उत्सुकता आतापासूनच सर्वांना लागून राहिली आहे. यामध्ये कोण कोण सहभागी होणार यावरून स्पर्धा लागली आहे. ‘बिग बॉस’मधील प्रतिस्पर्ध्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण, टीव्ही कलाकार गुरदीप कोहली, प्रत्युषा बॅनर्जी आणि कुशल टंडन हे तिघेही यामध्ये सहभागी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

टीव्ही कलाकार गुरदीप कोहली ‘संजीवनी’ या मालिकेत आणि ‘रावडी राठोड’ सिनेमात काम केले आहे. तर प्रत्युषा बॅनर्जी ही कलर्स वाहिनीवरील ‘बालिका वधू’ मालिकेतून झळकली होती. तिला त्याहमधून बरीचसी लोकप्रियता मिळाली आहे. तर कुशल टंडन स्टार प्लसवरील ‘एक हजारो मै मेरी बेहना है’ या मालिकेत काम करत आहे. मात्र, कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने तिघांनीही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

‘बिग बॉस’च्या सातव्या भागाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा सलमान खानच करणार असल्याचे फायनल झाले आहे. त्यासाठी त्यांनी मोठे मानधन घेतले आहे. हा शो १५ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे समजते.

Leave a Comment