पुण्याचे डेट्राईट होणार का ?

पुणे,ˆ पंचवीस वर्षानंतर पिंपरी,चिंचवड व तळेगाव चाकण परिसरात पुन्हा कामगार आंदोलनाचा काळ आला आहे. बजाज ऑटोमध्ये गेले पन्नास दिवस संप होता. गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड व तळेगाव लोणावळा परिसरातील कामगारांनी एक दिवसाचे ‘लक्षवेधी आंदोलन’ केले. त्यांचे म्हणणे असे होते की, या भागात वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणावर कामगारांची बेकारी सुरु झाली आाहे, त्याकडे राजकीय नेते लक्ष देत नाहीत आणि कामगार संघटनांनी आपल्या मुक्कामही येथून हालवले असल्याने त्यांनाही काही या समस्येचे पडलेले नाही. याकडे कोणाचे लक्ष गेले नाही तर गेली दहा वर्षे विदर्भमराठवाड्यात ज्या प्रमाणे शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या त्याप्रमाणे या भागातही कामगारांच्या आत्महत्या होतील. वास्तविक पिंपरी चिंचवडचा भाग हा जगातील आघाडीचा उद्योग परिसर मानला जातो व त्यातही येथीलवाहननिर्मिती उद्योगाला ‘पूर्वेकडील डेट्राईट’ म्हटले जात असताना येथील कामगारांत बेकारी यावी, हे काहीसे आश्चर्य वाटणारे होते. पण चौकशी करता असे कळले की, गेली शंभर वर्षे वाहननिर्मितीत आघाडीवर असलेले व प्रतिस्वर्ग मानले जाणारे अमेरिकेतील ‘डेट्राईट’ हे शहर हे जगातील सर्वात मोठे ओसाड खिंडार झाले आहे. एखाद्या ठिकाणी कामगारांना जगातील सर्वात अधिक पगार द्यायचे किंवा तेथील छोटया कारखानदारांना सर्वात चांगल्या दराने कामे द्यायची व जगात अन्यत्र स्वस्तात मिळू लागली तेथील उद्येाग हालवायचे, त्यामुळे अमेरिकेतील त्या प्रतिस्वर्गनगरीतील तीस लाख लोकवस्तीच्या ठिकाणी रिकाम्या झालेल्या हजारो घरांतून आज फक्त चोरांच्या व दरोडेखोरांच्या टोळ्याचे मुक्काम पडले आहेत.

पन्नास वर्षापूवीं येथे जे वाहन उद्योग सुरु झाले त्यांनी त्यांचे निम्मे अधिक उद्योग बाहेर हालवले आहेत. पन्नास वर्षापूर्वी पुण्यात अचानक पानशेत धरण फुटून महापूर आला व निम्मे पुणे वाहून गेले, त्यातून येथील अर्थव्यवस्थेला जीवदान देण्यासाठी एक मोठी औद्योगिक वसाहत उभारली. त्यात टेल्को, बजाज, फिरोदिया, भारत फोर्ज,थर्मॅक्स असे उद्योग वसविले. पण वीस वर्षापूर्वीची नवी अर्थव्यवस्था आल्यावर हे उद्योग व जगाच्या निरनिराळ्या भागातून (प्रामु‘याने अमेरिकेतून ) आलेल्या उद्योगांची कामाची पद्धती व हे जुने उद्योग यांचे एकत्र राहणे काही जमेना. त्याचाच एक भाग म्हणजे येथील टाटा, बजाज या उद्योगांना गुजरात, उत्तराखंड, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल येथूनही स्थलांतर करण्याची आकर्षणे येवू लागली. त्यातच जुना साठ ते सत्तर टक्के वाहन उद्योग स्थलांतरीत झाला. पण नव्याने पुण्याजवळील तळेगाव, चाकण भागात मर्सिडिज बेंझ, जनरल मोटर्स, वोक्स वॅगन अशा वीसहून अधिक कंपन्या आल्या पण त्यंाची कामगार हाताळणी पद्धत व येथील छोट्या उद्योगाकडून सुटे भाग करून घेण्याची पद्धत येवढी निराळी व येवढी बिनभरंवशाची होती की, आरंभी दुप्पट काम मिळाल्याचा आनंद घेणारे हे उद्योग आज निम्म्या कामावर समाधान मानत आहेत. त्यामुळे त्यानीही मोठ्या प्रमाणावर कामगार कपात केली आहे. पुणे शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या वाहनउद्योगाशी संबंधित लघुउद्योग व त्यातील कामगार यांची सं‘या दोन लाख आहे, एकाच वेळी मोठी महागाई वाढत असताना त्यांच्या पुढे रोजगार टिकवण्याची समस्या उभी राहिली आहे.

वीस वर्षापूर्वी भारताने नवी अर्थव्यवस्था स्वीकारली. त्याच्या पाठोपाठ देशातील प्रत्येक राज्यात विदेशी गुंतवणूक स्वीकारण्याची स्पर्धा लागली. पुण्यातील वाहनउद्योगांची पार्श्वभूमी बघून येथे जगातील महत्वाच्या कंपन्या येवू लागल्या. त्यात मर्सिडिस बेंझ, जनरल मोटार्स, व्होक्स वॅगन यांचा समावेश होता वास्तविक या कंपन्या आल्यार येथील ‘ऑटोहब’ व्याप्ती वाढायला हवी होती. पण विदेशी कंपन्या आल्या आल्या टाटांनी टेल्कोचे अनेक विभाग अन्य राज्यात हालविले, बहुतेक वाहननिर्मिती कंपन्यांनी एक विभाग येथे ठेवून अनेक विस्तारीत विभाग अन्य राज्यात हालविले. त्याचप्रमाणे गेली पन्नास वर्षे ते ज्या छोट्या कारखानदाराकडून सुटे भाग घेत असत.त्यांनाही दुसरे कमी किंमतीतील पर्याय त्यांना मिळाले. त्याच बरोबर जगात मंदीचा ‘दौर’ सुरु झाल्याने मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या अपेक्षित उत्पादन काढलेच नाही. त्यांचे सुटे भाग पुरविणारे येथे नव्हतेच. कांहीनी येथे काही कंपन्यांना ते काम दिले होत पण त्यात सातत्य नव्हते. त्याचा परिणाम कामगारांच्यावर झालाच पण पिंपरी चिंचवड परिसरावरही झाला कारण महापालिकेचे उत्पन्नही घटले. एकेकाळची श्रीमंत महापालिका तोट्यात गेली. याच वेळी अमेरिकेतील डेट्राईट या शहराचे जे वृत्त पुढे आले आहे ते अधिक अस्वस्थ करणारे आहे. कारण पुण्याची उद्योग नगरी वाढताना ‘पुणे हे पूर्वेकडील डेट्राईट ’ असे मानले जायचे. पण एका महिन्यापूर्वी ते शहरच भंगारात निघाले. एक मूळचे डेट्राइट शहर व त्याच्या बाजूला दुसरे जुळे डेट्राईट शहर असे हे शहर अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागोनंतरचे अनेरिकेतील मोठे शहर नामले जायचे. अमेरिकेतील सर्वात देखणे शहर अशी त्याची ‘याती होती. फोर्ड, पॅकॉर्ड, डॉग, कि‘स्लर या जगातील आघाडीच्या कंपन्या तेथे वाढल्या व जगात क‘मंाक एक झाल्या.आज त्या कंपन्या आहेत पण तेथे नाहीत. तेथील एक हजारहून अधिक कारखान्यात आज राखणदार ठेवणेही अशक्य झाले आहे.

यातील चिंतेचा विषय असा आहे की, अमेरिकासार‘या महासत्ता असलेल्या देशात एक शहर भंगारात काढणे परवडू शकले पण भारतासार‘या देशात ते परवडणारे नाही. आज जे जे विदेशी उद्योग येथे आहेत त्यातील लोकांनी आपले पर्यायी कसब विकसित करून ठेवणे आवश्यक आहे. हा नियम वाहननिर्मिती कंपन्यांना लागू आहे, आयटी कंपन्यांना लागू आहे, पुण्यात नव्याने वाढणार्‍या औषध कंपन्यांनाही लागू आहे आणि शिक्षणसंस्थांमध्ये काम करणारांनाही लागू आहे.

Leave a Comment