ट्रेनमध्ये सापडली २२ जिवंत काडतुसे

मुंबई: जोगेश्वरी एका रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये साफसफाई करत असताना २२ जिवंत काडतुसे सापडली आहेत. जोगेश्वरी रेल्वे यार्डात लोकलची सफाई करताना, कर्मचा-याला सिटखाली ही काडतुसे सापडली. ही काडतुसे ३८ बोअर रिव्हॉल्वरची आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गुरूवारी रात्री पावणे अकरा वाजता लोकल ट्रेन यार्डात उभी होती. यावेळी साफसफाई करत असताना सफाई कर्मचा-याला ही काडतुसे आढळली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे रेल्वे पोलिसांनी ती जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

यार्डमध्ये एका लोकलमध्ये २२ जिवंत काडतुसे सापडल्याचे वृत्त सगळीकडे पसरले असून त्यामुळे मुंबई शहरात सर्वत्र सावधनतेचा इशारा पोलिसांनी दिला असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment