अनुष्का करणार सिंगरची भूमिका

आगामी काळात येत असलेल्या दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमात अनुष्का शर्मा प्रमुख रोल करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात अनुष्का ६०च्या दशकातील जॅझ सिंगरची भूमिका करणार असल्याचे समजते. या सिनेमाची तयारी अनुष्का गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी ती इंडो-ऑस्ट्रेलियन जॅझ सिंगरकडून प्रशिक्षणही घेत आहे.

अनुराग कश्यप यांच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमात अनुष्काक शर्मा एका बार डान्सरच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र या सिनेमात अनुष्का रणबीर कपूरसोबत काम करणार असून या मध्ये ती जॅझ सिंगरची भूमिका करणार आहे.

दोघांव्यतिरीक्त चित्रपटात करण जोहर पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. आगामी काळात लवकरच या सिनेमाचे शुट लवकरच सरु होणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

Leave a Comment