विद्या झळकली गेस्ट रोलमध्ये

एकता कपूर प्रमाणेच अभिनेत्री विद्या बालन ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी का धडपड करीत होती याचे उत्तर आज हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना या मिळाले आहे. कारण की ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमात विद्या बालन गेस्ट रोलमध्ये झळकली आहे. विद्याच्या चाहत्यांसाठी हे एक सरप्राईजच आहे.

एकता कपूरच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ आणि यूटीव्हीच्या `चेन्नई एक्सप्रेस` मध्ये वाद झाला होता. परंतु, त्यांनतरही विद्या ‘वन्स अपॉन’मध्ये गेस्ट रोलमध्ये झळकल्याने या अफवांना ब्रेक मिळाला. विद्या बालन ही या सिनेमात एक ‘कॅमिओ’ करते आहे.

विद्याचा पती सिद्धार्थ रॉय-कपूर हा चेन्नई-एक्सप्रेसच्या निर्मात्यांपैकी एक आहे आणि हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. चेन्नई एक्सप्रेस ईदच्या मुहूर्तावर रिलीज केला. याचमुळे विद्या आणि एकतामध्येही थोडा वाद झाला होता या वादाचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नातही काही जण होते परंतू ‘वन्स अपॉन’ रिलीज झाल्यानंतर आणि त्यात विद्याला पाहिल्यानंतर त्यांच्या अपेक्षा मात्र अपु-याच राहणार आहेत.

Leave a Comment