पाणबुडीत लागलेली आग आटोक्यात

मुंबई: येथील डॉकयार्डमधील ‘सिंधुरक्षक’ पाणबुडीत लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र तरीही या पाणबुडीवर आणखी काही कर्मचारी अडकले असल्याुची शक्यता आहे. या पाणबुडीवर १८ कर्मचारी होते. त्यातील काही जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर काही जण अजूनही या पाणबुडीवर अडकल्याची माहिती नौदलाने दिली आहे. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीमध्ये मंगळवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी स्फोटाचा आवाज झाला आणि त्यानंतर भीषण आग लागली. सूत्रांच्या मते या पाणबुडीत काही स्फोटकजन्य पदार्थ होते. त्यामुळेच हा स्फोट झाल्याची शक्यता आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमल दल घटनास्थळी दाखल झाले आणि दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीशेजारीच ‘सिंधुरत्न’ ही पाणबुडी होती. तिलाही या आगीने नुकसान झाले असल्याषची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना झाल्याने या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी नौदलाने चौकशी समितीची घोषणा केली आहे.