चीनची सीमेबरोबरच अर्थिक क्षेत्रातही घुसखोरी !

पुणे, गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेत सापडलेल्या 970 कोटी नोटांनी देशातील अर्थविषयक क्षेत्रातील जाणकारांचे कान टवकारले गेले आहेत. आजपर्यंत छापलेल्या नोटांच्या प्रमाणात कमी नोटा सापडण्याचे प्रकार घडले आहेत. पण एकेएका बॅचमध्ये सापडल्या नोटा पन्नास हजार कोटीच्या आणि काही दिवसांनी तपासायला गेल्यावर त्याच नंबरक‘मांच्या मिळाल्या नोट एक्कावन्न हजार कोटीच्या, असे जर झाले असेल तर असा प्रकार चुकून झाला असेल, अशा प्रकारात निश्चित मोडत नाही. गेली पंचवीस वर्षे देशात येणार्‍या बनावट नोटांच्या तपासणीचा व्यासंग असलेल्यांचे म्हणणे असे की, या नोटा शेजारी देशाने घुसवलेल्या चलनात मोडतात. आजपर्यंत पाकिस्तान आपल्या देशात अनेक बाजूंनी नोटा घुसवत असे. त्या देशाने त्या देशाच्या निर्मितीपासून भारताची शत्रुत्त्व ठेवल्याने भारताची अर्थव्यवस्था ढिली करण्याचा प्रयत्न करणे हा त्या देशाचा एक कार्यक‘मच असे. पण गेल्या अडीच वर्षापासून भारतातील चलनाची बनावट चलने करण्यात चीन गुंतल्याच्या बातम्या जागतिक स्तरावरील महत्त्वाची प्रसारमाध्यमे देऊ लागली आहेत.

गेली वीस वर्षे बनावट नोटा तपासण्याचा व त्यासाठी यंत्रे बनवण्याचा व्यासंग असलेले पुण्यातील उद्योजक श्री अनिल काळे यांचे असे म्हणणे की, गेल्या अडीच वर्षात या भारतीय बनावट नोटा प्रकरणात चीन दिसू लागला आहे. जगभरच्या महत्त्वाच्या प्रसारमाध्यमात तशा बातम्याही आल्या आहेत. बनावट नोटांच्या क्षेत्रात पाकिस्तान आणि चीनचे कसब यात मोठा फरक असणे सहाजिक आहे. पण त्यातील नोटा उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या पद्धतीत आम्ही त्यातील बनावटगिरी निश्चित उजेडात आणू. पण बनावट नोटांचा मुद्दा फारच व्यापक असल्याने केवळ सरकारी पातळीवर याची दखल घेवून चालणार नाही तर देशभर मोठया प्रमाणावर नोटा हाताळायच्या प्रत्येक ठिकाणी त्याच्या तपासणीबाबत जागृती असण्याची गरज आहे.

देशाच्या सीमेवर चीन आणि पाकिस्तान हे देश घुसखोरीत गुंतले असताना गेल्याच आठवड्यात आंध‘प्रदेशच्या मु‘यमंत्र्यांना आंध‘ात एकशे साठ लक्ष कोटी रुपये गुंतवण्याचा प्रस्ताव चीनने दिला आहे. आंध‘मध्ये देशातील नक्षली चळवळ मोठ्या प्रमाणात आहे, अशा आंध‘चा तेलंगणाचा भाग स्वतंत्रपणे राज्याचा आकार घेण्याची घोषणा केंद्रातील काँग‘ेससरकारने केली आहे. एकशे साठ लक्ष कोटी रुपये म्हणजे नव्याने उदयास येण्याची शक्यता असलेल्या तेलंगणाची पुढील पंचवीस वर्षाची अर्थव्यवस्था होय. त्याच्या व्याजावरही सार्‍या आंध‘ राज्याची अर्थव्यवस्था चालू शकते. चीन हा देश येथे गुंतवत असलेली रक्कम ही स्वतंत्रपणे गुंतवण्याची शक्यता असली तरीही महासत्तेचे हस्तक येथे काय करतील हे काही विचारून करणार नाहीत. त्यामध्ये अधिकृत नोटाबरोबरच बनावट नोटांचे प्रमाण असण्याची शक्यता. हा एक चिंतेचा विषय असणार आहे.

सीमेवरील घुसखोरी, बनावट नोटांची घुसखोरी व अर्थव्यवस्थेत घुसखोरी याबरोबर अजून एक मोठी घुसखोरी चीनने केली आहे. ती म्हणजे भारतीय बाजारपेठेत चीनने फारच मोठ्या प्रमाणावर ग‘ाहकोपयोगी वस्तूंचे प्रचंड साठे आणि संगणक वगैरे यंत्रसामुग‘ी आणली आहे.भारतातील शालेय मुलांना अगदी नाममात्र किंमतीत किंवा सरकारी मदतीने विनामूल्य स्वरुपात टॅब्लेट (म्हणजे इंटरनेटची सुविधा असणारा शालेय संगणक) देण्याबाबत योजना आकार घेऊ लागल्या आहेत. त्यात त्या येवू घातलेल्या टॅब्लेटची सं‘या काही कोटी आहे.

चीनच्या सीमेवरील व अर्थिक क्षेत्रातील घुसखोरीने या क्षेत्रातील जाणकार चिंतीत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत जर परदेशी शक्तींनी बनवलेल्या नोटा बेमालूम स्वरुपात जर घुसखोरी करत असतील तर त्या तपासण्यासाठी आणिबाणीकालीन उपाय योजणे आवश्यक आहे. त्या तपासण्याच्या यंत्रांचे निर्माते म्हणून आम्ही तर त्या निश्चितपणे तपासून देवू पण भारतीय चलनव्यवस्थेत घुसखोरी नोटा कोठून येतात याचा वेध घेणे व त्या तपासल्या जाणे याला त्यामुळे फारच महत्त्व आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मदतीने आम्ही निरनिराळ्या त्या बँकेच्या, स्टेटबॅकेच्या व अन्य मोठ्या बॅकेच्या तिजोर्‍यांच्या ठिकाणी आमची पाचशेहून अधिक यंत्रे बसविली आहेत. आम्ही त्या नोटा निश्चितपणे तपासून देऊ व त्या नोटांचा खरेखोटेपणा उघडा पाडू पण संबंधित देश हे त्या बनावटनोटांचे स्वरुप कायम बदलत राहणार, त्यासाठी प्रत्येकाने या तपासणीसाठी एक पाऊल पुढे येण्याची आवश्यकता आहे. पुढील काळातील युद्ध बहुदा याच प्रकारचे असेल असे आता दिसू लागले आहे.

Leave a Comment