अण्णा हजारे अमेरिकेत करणार स्वातंत्र्यदिन

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन आठवड्यांच्याल अमेरिकन दौ-यावर जात आहेत. त्याईमुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन अण्णा अमेरिकेत साजरा करणार आहेत. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सोहळा, अमेरिकेतील नॅस़डॅकमध्येही साजरा केला जातो. तिथे बेल वाजवण्याचा मान यंदा अण्णा हजारेंना देण्यात आला आहे. अण्णा दोन आठवड्यांचा अमेरिकन दौरा, १६ ऑगस्टपासून सुरू होतोय. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरु आहे.

अण्णांच्या या दौ-याची सुरुवात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याने सुरू होणार आहे. या सोहळ्यासाठी दरवर्षी हजारो भारतीय त्याचप्रमाणे अमेरिकन नागरिक उपस्थिती लावतात. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरु आहे. खरे तर राजकीय पदावर नसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच इतकी तयारी होत असल्याचे मानले जात आहे.

त्यासोबतच भारतीय वंशाच्या साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हॅले यांनी अण्णा यांच्यासोबत जेवणाचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी अण्णाचे भ्रष्टाचारासंदर्भातील विचार ऐकण्यासाठी हजारो नागरिक उपस्थिती लावतील असा अंदाज आहे. याशिवाय अण्णांची मुलाखत घेण्यासाठीही अमेरिकेतील माध्यमांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे अण्णांच्या दौ-याला विशेष मह्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Comment