केजोचे विद्यार्थी पुन्हा चमकणार

“स्टुडंट ऑफ दी इअर” या चित्रपटात झळकलेले निर्माता दिग्दर्शक करण जोहरचे विद्यार्थी म्हणजेच नवोदित कलाकार आलिया भट्ट, वरून धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा. यांनी प्रेक्षकांची खूप वाहवा मिळवली. यांच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्लाही जमविला. यातील आलिया भट्ट आणि वरून धवन लवकरच पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. केजो ही या जोडीवर खुश आहे; म्हणूनच की काय तो आलियाला आणि वरुणाला आपल्या आगामी चित्रपटात घेतले आहे. ही एक क्रेझी लव्ह स्टोरी असून याच शुटींग पंजाब मध्ये होणार आहे. करणचा हा चित्रपट २७ जून २०१४ मध्ये रिलीज होणार आहे. ” हंम्टी शर्मा कि दुल्हनिया” असे या चित्रपटाचे नाव आहे. शशांक खैतान हा चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Leave a Comment